Japan school: जपानच्या शाळांमधील ८ खास गोष्टी, ज्या जगात कोठेच शिकवत नाहीत

पुढारी वृत्तसेवा

जपानी शाळांमध्ये लहान वयापासूनच मुलांमध्ये शिस्त, वेळेचे पालन आणि जबाबदारीची जाणीव निर्माण केली जाते.

तिथे बहुतांश शाळांमध्ये सफाई कर्मचारी नसतात. वर्गखोल्या, परिसर आणि कॅन्टीनची स्वच्छता विद्यार्थी स्वतः करतात.

अभ्यासासोबतच प्रामाणिकपणा, इतरांचा आदर करणे, परस्परांना सहकार्य करणे आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या नैतिक मूल्यांचे धडे दिले जातात.

मुलांमध्ये एकत्रित काम करण्याची आणि एकमेकांना मदत करण्याची वृत्ती वाढीस लागावी, यासाठी अनेक उपक्रम गटामध्ये घेतले जातात.

शाळेमध्ये मुलांना सकस आणि पौष्टिक जेवण दिले जाते. अनेकदा मुले स्वतःच एकमेकांना जेवण वाढण्यास मदत करतात.

शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच जपानची पारंपरिक संस्कृती आणि मूल्यांची ओळख मुलांना करून दिली जाते.

मुलांना स्वतः शाळेत जाणे-येणे, स्वतःच्या वस्तूंची काळजी घेणे आणि दैनंदिन जीवनातील लहान-सहान निर्णय स्वतः घेणे शिकवले जाते.

केवळ शैक्षणिक प्रगतीवर भर न देता इतरांशी नम्रतेने वागणे, निसर्ग व पर्यावरणाचा आदर करणे आणि संवेदनशील नागरिक बनण्यावर विशेष लक्ष दिले जाते.