Cat Islands | काय सांगता! या बेटावर माणसांपेक्षा मांजरांचीच संख्या जास्त!

Namdev Gharal

जपानच्या सेतो इनलँड समुद्रामध्ये (Seto Inland Sea) असे एक बेट आहे, जिथे गेल्या अनेक वर्षांपासून माणसांपेक्षा मांजरांचीच संख्या जास्त आहे.

हे बेट म्हणजे एहिमे प्रांतातील 'आओशिमा' (Aoshima) नावाचे छोटे बेट, जिथे गाड्या नाहीत, सुपरमार्केट नाहीत पण तिथे आहेत मांजरेच मांजरे

या बेटांवर मोजकी जुनी घरं, वीसपेक्षा कमी रहिवासी आणि ३०० हून अधिक मांजरी आहेत, आणि या बेटावर या मांजरांचे राज्य आहे.

या मांजरी आपल्या मनाप्रमाणे वागत असतात. बोटींवर झोपणे, रस्ते अडवून बसणे आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करणे, हे तिथल्या मांजरांचे वैशिष्ट्य आहे.

मासेमारीच्या बोटींवरील उंदरांचा त्रास कमी करण्यासाठी सुरुवातीला तिथे काही मांजरी नेण्यात आल्या होत्या. हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली आणि गावकरी कमी होत गेले

एकेकाळी या बेटाची लोकसंख्या जवळपास नऊशे होती.पण माणसांनी रोजगारासारख्या कारणांनी स्थलांतर करायला सुरुवात केली, तेव्हा मांजरींनी तिथेच राहून पूर्ण बेटावर आपला ताबा मिळवला.

जेव्हा बेटावर दिवसातून एकदाच येणारी बोट धक्क्याला लागते, तेव्हा अनेक मांजरी तिथे तुमची वाट पाहत असतात; तुम्ही त्यांच्यासाठी खायला काय आणले आहे, हे पाहण्यासाठी त्या तिथे जमतात

बेटावर राहणारे मोजके (१०-१५) वृद्ध नागरिक या मांजरांची काळजी घेतात. जरी त्यांची संख्या कमी असली, तरी ते या मांजरांना नियमितपणे खायला घालतात.

सोशल मीडियामुळे हे बेट प्रसिद्ध झाल्याने अनेक लोक ऑनलाइन माध्यमातून अन्न आणि पैसे दान करतात. जपानमधील अनेक संस्था या मांजरांसाठी अन्नाची पाकिटे बेटावर पाठवतात

सध्या जगभरातून पर्यटक फक्त या मांजरींना पाहण्यासाठी आणि त्यांना खाऊ घालण्यासाठी या बेटावर येतात.

बेटावर मांजरांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू नये म्हणून आता जपानी प्रशासनाने तिथल्या बहुतांश मांजरांचे नसबंदी ऑपरेशन केले आहे.