Namdev Gharal
उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात मिळणारी करवंदे आणि जांभळे ही फळे केवळ चवीलाच छान असतात असे नाही, तर ती आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जातात.
करवंद जांभूळ या दोन्ही रानमेव्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
करवंद आणि जांभूळ या फळांचे वैशिष्टये म्हणजे ही केवळ कडक उन्हाळयात म्हणजे मे मध्येच मिळतात ही खाण्यामुळे शरीराला कोणते मुख्य फायदे मिळतात, ते पाहू
जांभळामध्ये 'जांबोलिन' (Jamboline) नावाचे ग्लुकोसाइड असते, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जांभळाच्या बियांची पूडही मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानली जाते.
पाचक शक्ती सुधारते: जांभळामध्ये असलेल्या फायबरमुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्टतेचा त्रास कमी होतो. तसेच हे लिव्हरच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे.
जांभळात भरपूर प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन 'सी' असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि रक्त शुद्ध होते.
यात असणारे पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते.
करवंदाचे फायदे : करवंदामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि 'ए' चे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीराची इन्फेक्शन आणि आजारांशी लढण्याची ताकद वाढते.
उन्हाळ्याच्या दिवसांत करवंद खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
करवंदाचे सेवन केल्याने भूक वाढते आणि पित्ताचा त्रास कमी होतो. जुलाब किंवा शौचास साफ होत नसेल, तर करवंद खाणे फायदेशीर ठरते.
यातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचा तजेलदार ठेवतात आणि अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत करतात.
करवंद आणि जांभूळ एकत्र किंवा या हंगामात नियमित खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला नैसर्गिकरीत्या ऊर्जा मिळते.
ही फळे खाताना थाडीशी काळजी घ्यावी ते म्हणजे जांभूळ किंवा करवंद कधीही रिकाम्या पोटी खाणे टाळावे, तसेच जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये.