Jaggery Benefits : गुळामध्ये आहे पोषक तत्त्वांचा खजिना

पुढारी वृत्तसेवा

सध्याच्या काळात आरोग्याबाबत जागरूक असलेले अनेक लोक पांढऱ्या साखरेपासून दूर पळत आहेत. पण साखरेला पर्याय म्हणून काय वापरावे? असा प्रश्न पडतो.

आयुर्वेदामध्ये गुळाला केवळ अन्नाचा पदार्थ नाही, तर ‌‘अमृत‌’ मानले गेले आहे.

गूळ शरीराला हानी पोहोचवत नाही, उलट तो अनेक पोषक तत्त्वांचा खजिना आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

गूळ हा नैसर्गिक पद्धतीने बनवला जातो.

गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखी खनिजे टिकून राहतात, जी शरीराला ऊर्जा देण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात.

जेवणानंतर गुळाचा एक छोटा खडा खाल्ल्याने पचन संस्था सक्रिय होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

गुळामध्ये उष्ण गुणधर्म असल्याने, आल्यासोबत गुळाचे सेवन केल्यास छातीतील कफ दूर होतो आणि सर्दी-खोकल्यात आराम मिळतो.

गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते आणि ॲनिमियाचा धोका कमी होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.