पुढारी वृत्तसेवा
गूळ आणि हरभरा यांचे मिश्रण हे एक उत्तम सुपरफूड आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. याचे सेवन केल्याने शरीराला मिळणारे आरोग्यदायी फायदे आहेत.
गुळातील लोह, कॅल्शियम आणि खनिजे शरीराला ऊर्जा देतात, तर हरभरा प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतो.
गूळ आणि हरभऱ्यामध्ये असलेली पोषक तत्त्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
हरभऱ्यातील फायबर पचनसंस्था मजबूत करते, तर गुळामुळे पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
गुळातील नैसर्गिक साखर त्वरित ऊर्जा देते, तर हरभरा शरीरातील ऊर्जेची पातळी दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करतो. यामुळे दिवसभर उत्साह जाणवतो.
हरभऱ्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, परिणामी वारंवार भूक लागत नाही. हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
कसे आणि कधी सेवन करावे?
सकाळी नाश्त्यात गूळ आणि भाजलेले हरभरे (फुटाणे) एकत्र खाणे अधिक गुणकारी ठरते.
सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने शरीराला जास्तीत जास्त फायदा होतो.
या गोष्टींची काळजी घ्या
गुळात कॅलरीज जास्त असल्याने त्याचे अतिसेवन टाळावे. तसेच मधुमेही रुग्णांनी गुळाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ज्यांना गॅस्ट्रिक किंवा पचनाच्या गंभीर समस्या आहेत, त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.