पुढारी वृत्तसेवा
पुरीचे जगन्नाथ मंदिर हे केवळ आपल्या भव्यतेसाठीच नाही, तर त्याच्याशी जोडलेल्या अनेक गूढ रहस्यांसाठीही जगभर प्रसिद्ध आहे.
यातील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे मंदिराच्या शिखरावरील ध्वज, जो नेहमी हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने फडकावला जातो.
विज्ञानालाही आजवर याचे ठोस कारण शोधता आलेले नाही. त्यामुळे स्थानिक लोक आणि भाविक याला भगवान जगन्नाथांची दैवी शक्ती मानतात.
मंदिरावरचा हा ध्वज दररोज सायंकाळी बदलण्याची अत्यंत कठोर परंपरा आहे. ऊन, वारा किंवा पाऊस काहीही असले तरी हा नियम मोडला जात नाही.
अशी मान्यता आहे की, जर एका दिवसासाठीही हा ध्वज बदलला नाही, तर मंदिर तब्बल 18 वर्षांसाठी बंद करावे लागेल.
ही पवित्र जबाबदारी मागील 800 वर्षांपासून चुनरा सेवक (चोला) हे एकच कुटुंब वंशपरंपरागत निभावत आहे.
सर्वात विशेष म्हणजे हे सेवक कोणत्याही आधुनिक सुरक्षा उपकरणाशिवाय 214 फूट उंच शिखरावर चढून हा ध्वज बदलतात.
जुना ध्वज नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि नवीन ध्वज वातावरणात सकारात्मकता आणतो, असे मानले जाते. हे रहस्य विज्ञानापलीकडचे असून भक्तांच्या श्रद्धेचा हा जिवंत पुरावा आहे.