हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी पडते का? घरच्या 'या' उपायांनी त्वचा राहील मऊ-चमकदार!

पुढारी वृत्तसेवा

नैसर्गिक तेलांचा करा वापर

खोबरेल तेल, बदाम तेल किंवा तीळ तेल त्वचेवर लावल्याने नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास मदत होते. ओलसर त्वचेवर तेल लावल्यास अधिक फायदा होतो.

कोरफड जेल लावा

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि ताणलेली वाटत असल्यास ताजे कोरफड जेल लावा. यामुळे त्वचेला थंडावा आणि आराम मिळतो.

मधाचा करा वापर

कोपर, गुडघे आणि गालांसारख्या कोरड्या भागांवर थोडा मध लावा. १० मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा. मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो.

ग्लिसरीन आणि गुलाबजल

ग्लिसरीन आणि गुलाबजल एकत्र करून त्वचेवर लावा. यामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.

दूध किंवा दह्याचा फेसपॅक

बेसन किंवा ओट्समध्ये थोडे दूध किंवा दही मिसळून सौम्य फेसपॅक तयार करा. हा पॅक लावल्याने त्वचा मऊ राहण्यास मदत होते.

गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा

खूप गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते. त्यामुळे हिवाळ्यात कोमट पाण्याने ५ ते १० मिनिटांत आंघोळ करा.

आंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावा

आंघोळीनंतर टॉवेलने त्वचा घासण्याऐवजी हलक्या हाताने टिपून घ्या. त्वचा थोडी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर किंवा तेल लावा.

पुरेसे पाणी प्या

दिवसभर पुरेसे पाणी प्या. कडक किंवा सुगंधी साबणाऐवजी सौम्य मॉइश्चरायझिंग क्लीन्सर वापरा.

योग्य कपडे घाला

लोकरीच्या कपड्यांमुळे खाज किंवा त्रास होत असल्यास आतून मऊ सुती कपडे घाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.