घरगुती गॅस जास्‍त दिवस जात नाही? मग वापरा 'या' टिप्स..

पुढारी वृत्तसेवा

गॅस चालू करून भाज्‍या कांदा चिरायला घेणे टाळा. सर्व साहित्‍य गोळा करूनच गॅस पेटवा.

गॅसवर ओली भांडी ठेवल्‍याने गॅस अधिक लागतो. त्‍याऐवजी भांडी कोरडी करून ठेवल्‍याने गॅस बचत होईल.

फ्रिजमधून काढलेले साहित्‍य किंवा भांडी गॅसवर ठेवू नये. त्‍याचे तापमान सामान्य झाल्‍यावर गॅसवर ठेवावे.

अन्न शिजवताना पातेल्‍यावर झाकण ठेवा. यामुळे अन्न कमी वेळेत शिजेल व गॅसची बचत होईल.

प्रेशर कुकरमध्ये अन्न् शिजवल्‍याने वेळ आणि ऊर्जा दोन्हीची बचत होईल.

घरात सारखा चहा किंवा गरम पाणी लागत असेल तर एकदाच थर्मासमध्ये भरून ठेवा. गॅसची बचत होईल.

कोणताही पदार्थ शिजवताना पातेल्‍याच्या हिशोबाने गॅस ठेवा. यामुळे गॅसची बचत होईल.

दर ३ महिन्यांनी गॅसच्या फ्लेमकडे लक्ष द्या. फ्लेमचा रंग लाल ऑरेंज असेल तर गॅस गळती होतेय. कचरा अडकला आहे असे समजावे. फ्लेमचा रंग निळा असावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.