तुमच्या वाहनावर ई-चलान प्रलंबित आहे का? घरबसल्या ऑनलाईन तपासा

पुढारी वृत्तसेवा

ई-चलान प्रलंबित आहे का?

तुमच्या वाहनावर ई-चलान प्रलंबित आहे का, हे घरबसल्या ऑनलाईन तपासता येते.

वाहनावर ई-चलान कसे जारी होते?

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहनाच्या क्रमांकावर ई-चलान जारी केले जाते.

कोणत्या नियमभंगासाठी दंड?

हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, वेगमर्यादा ओलांडणे, सिग्नल तोडणे, वाहन चालविताना मोबाईल वापरणे यांसारख्या नियमभंगासाठी दंड आकारला जातो.

अधिकृत संकेतस्थळावर जा

ई-चलान तपासण्यासाठी echallan.parivahan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.

योग्य पर्याय निवडा

चलान नंबर, वाहन नंबर किंवा वाहन परवाना नंबर यापैकी पर्याय निवडा.

क्रमांक आणि कॅप्चा भरा

संबंधित क्रमांक आणि कॅप्चा भरा आणि ‘गेट डिटेल्स’वर क्लिक करा.

चलानची संपूर्ण माहिती पाहा

वाहनावरील प्रलंबित चलान, दंडाची रक्कम आणि नियमभंगाची माहिती पाहता येईल. उपलब्ध असल्यास नियमभंगाचा फोटो/पुरावाही पाहता येतो.

सायबर स्कॅमपासून सावधान!

ई-चलानाच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका; अधिकृत संकेतस्थळावरच चलान तपासा आणि दंड भरा.

असा भरा ऑनलाईन दंड!

प्रलंबित चलान निवडल्यानंतर उपलब्ध ऑनलाईन पेमेंट पर्यायातून यूपीआय, नेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे दंड भरता येतो. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मिळालेली पावती जतन करून ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.