अ‍ॅनाबेल बाहुली खरोखरच शापित आहे? ज्याच्याजवळ गेली तो मेला!

पुढारी वृत्तसेवा

अ‍ॅनाबेल बाहुलीची गोष्ट १९७० च्या दशकात सुरू होते, जेव्हा अमेरिकेतील एका आईने तिच्या मुलीला बाहुली भेट दिली.

बाहुली सामान्य दिसत होती, परंतु लवकरच ती विचित्र वागणूक दाखवू लागली. ती बाहुली स्वतःहून स्थान बदलत असे, कधीकधी खुर्चीवरून जमिनीवर किंवा कधीकधी दुसऱ्या खोलीत आढळल्याचे म्हटले आहे.

डोना आणि तिची रूममेट अँजी यांना सुरुवातीला वाटले की ही फक्त कल्पना आहे, परंतु नंतर भयानक घटना वाढल्या. त्‍यांच्या लक्षात आले की बाहुलीवर कागदावर "मला मदत करा" असे संदेश लिहिलेले होते. एके दिवशी बाहुलीच्या हातावर आणि छातीवर रक्ताचे डाग आढळले.

घाबरून त्यांनी पॅरानॉर्मल एक्सपर्ट एड आणि लोरेन वॉरेन यांना बोलावले. चौकशीनंतर वॉरेनने दावा केला की, ही बाहुली मानसांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणारी एक राक्षसी शक्ती आहे. नंतर ती वॉरेनच्या ऑकल्ट म्युझियममधील काचेच्या पेटीत बंद करण्यात आली.

अमेरिकन पैरानॉर्मल इन्वेस्टिगेटर डॅन रिवेराच्या अलिकडेच झालेल्या गूढ मृत्यूमुळे अ‍ॅनाबेल पुन्हा चर्चेत आली. डॅन "डेव्हिल्स ऑन द रन" नावाच्या एका भयपट दौऱ्यावर होता, ज्यामध्ये अ‍ॅनाबेल बाहुलीचा समावेश होता. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अफवा पसरल्या की अ‍ॅनाबेलची शापित शक्ती यासाठी कारणीभूत असू शकते.

तथापि, अनेकांना वाटते की ही केवळ अफवा आहे, कारण कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तरीही, ही घटना अ‍ॅनाबेलची भयानक प्रतिमा अधिक बळकट करते. अ‍ॅनाबेलची गोष्ट कधीही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली नाही. बरेच जण वॉरेन जोडप्याच्या दाव्यांना केवळ प्रसिद्धी स्टंट मानतात.

अ‍ॅनाबेलची भीती अमेरिकेत दशकांपासून कायम आहे, विशेषतः "द कॉन्ज्युरिंग" चित्रपटांच्या रिलीजनंतर. ऑकल्ट म्युझियम बंद पडल्याने आणि डॅन रिवेराच्या मृत्यूने ही भीती आणखी वाढली.

शापित बाहुल्यांची भीती मानवी मानसशास्त्रात खोलवर रुजलेली आहे. लोकांना अज्ञात आणि गूढ गोष्टींची भीती वाटत आली आहे. तसेच सोशल मीडिया या भीतीला खतपाणी घालतो. अ‍ॅनाबेलेची गोष्ट वॉरेन पती-पत्‍नी आणि हॉलिवूडने प्रसिद्ध केली.