साबुदाणा हेल्दी की हानिकारक? रोज सेवन केल्याने शरीरावर काय परिणाम!

पुढारी वृत्तसेवा

भारतामध्ये धार्मिक उपवासाच्या काळात साबुदाण्याचा वापर खूप सामान्य आहे.

साबुदाणा हलका, सहज पचणारा आणि ऊर्जा देणारा मानला जातो.

परंतु सलग दिवसांच्या उपवासात रोज साबुदाणा खाल्ल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

विशेषतः मधुमेह असलेल्यांनी किंवा ज्यांची पचनसंस्था कमकुवत आहे त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

पचनाच्या समस्या : साबुदाण्यात स्टार्चचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला लगेच ऊर्जा देते. पण जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस होणे, अपचन जुलाबची समस्या होउ शकते.

साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असतो, त्यामुळे तो रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढवतो. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.

साबुदाण्यात कॅलरीचे प्रमाण जास्त असते. रोज खाल्ल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा होतात आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.

जास्त प्रमाणात साबुदाणा खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. दीर्घकाळ असेच सेवन केल्यास हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो

उपवासात साबुदाणा खायला हरकत नाही, पण तो मर्यादित प्रमाणात खावा. त्यासोबत दही, सुकेमेवे खाल्ल्यास पचन सुधारते, साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.