Pohe breakfast: सकाळी पोहे खाणे खरोखरच आरोग्यदायी आहे का?

पुढारी वृत्तसेवा

सकाळी झोपेतून उठल्यानंतरचा पहिला आहार हा फक्त कॅलरीजचा नसून प्रोटिन, फायबर, फॅट्स आणि ब्लड शुगर कंट्रोल करणारा असावा.

सकाळचा नाश्ता दुपारच्या जेवणावरही परिणाम करतो. नाश्ता योग्य असेल, तर दुपारनंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

पोह्यांमुळे शरीराला आणि मेंदूला तातडीने ऊर्जा मिळते. कार्बोहायड्रेट्स शरीरासाठी आवश्यक असतात, त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही!

कांदा आणि कोथिंबीर घालून केलेले साधे पोहे खाल्ल्यास १०-११ वाजता पुन्हा भूक लागू शकते. कारण त्यातून शरीराला पुरेसे प्रथिन मिळत नाही.

पोह्यांमध्ये मटार, भाज्या आणि शेंगदाणे नक्की टाका. सोबत दही, पनीर किंवा अंडे खाल्ल्यास नाश्ता संतुलित होतो.

शेंगदाणे निरोगी फॅट्स आणि प्रोटिन देतात, त्यामुळे ते नक्की खा. तसेच शेव चवीपुरती ठीक आहे, पण पोहे कमी आणि शेव जादा असं नको.

पोहे चुकीचे नाहीत, तर अपुरा नाश्ता चुकीचा आहे. ट्रेंडी आहारापेक्षा रोजचे पारंपरिक पोहे योग्य प्रकारे बनवून खाणे हेच आरोग्यासाठी उत्तम आहे.

तज्ञांच्या मते, नाश्ता करणे प्रत्येकासाठी अनिवार्य नसले तरी, जेव्हा तुम्ही नाश्ता करता तेव्हा केवळ कॅलरीजचा विचार करू नका.

त्याऐवजी प्रथिने, तंतूमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, ऊर्जा, पोट भरल्याची भावना आणि विशेषतः रक्तातील साखर या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.