पुढारी वृत्तसेवा
सध्या उन्हाळा सुरु असून काकडीची मागणी प्रचंड वाढली आहे. बाजारातही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पण अनेकवेळा काकडी सालीसहीत की साल काढून खाणे असा प्रश्न पडतो
कारण बाजारात उपलब्ध असलेली काकडी ही सेंद्रीय आहे की रासायनिक फवारणी करुन उत्पादित केली आहे हे ओळखणे कठीण आहे
जर काकडी सालीसहीत खाली तर ती अधिक फायदेशीर ठरते काकडीच्या सालेमध्ये विद्राव्य फायबर (Insoluble Fiber) मोठ्या प्रमाणात असते. हे पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करते.
काकडीच्या सालेमध्ये व्हिटॅमिन K भरपूर असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. तसेच यात बीटा-कॅरोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
जरी साल फायदेशीर असली तरी पण काही बाबतीत काकडीची साल काढणे उपयुक्त ठरु शकते
हल्ली काकडीवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा फवारा केला जातो. जर काकडी सेंद्रिय (Organic) नसेल, तर सालीमध्ये ही रसायने साचलेली असू शकतात.
काकडी ताजी आणि चमकणारी दिसावी म्हणून अनेकदा त्यावर मेणाचा पातळ थर लावला जातो. हा थर साध्या पाण्याने निघत नाही, अशा वेळी साल काढणे सुरक्षित असते.
कडू चव: जर काकडीची साल खूप जाड किंवा कडू असेल, तर ती काढणेच बरे. यामुळे काकडीचा कडवटपणा कमी होतो
स्वच्छता: जर तुम्हाला सालेसह काकडी खायची असेल, तर ती किमान १०-१५ मिनिटे कोमट पाण्यात मीठ टाकून भिजत ठेवा आणि नंतर घासून धुवा. यामुळे कीटकनाशकांचा परिणाम कमी होतो.
काकडी खाण्यापूर्वी तिची दोन्ही टोके कापून थोडी घासून घ्यावीत, जेणेकरून त्यातील कडूपणा निघून जाईल.