Iron cooking pot| लोखंडी भांडीः आजीच्या काळातील ही पद्धत आरोग्यासाठी ठरेल वरदान!

Namdev Gharal

आजकाल अन्न शिजवण्यासाठी नॉनस्टिक, कोटींग असलेली भांडी सर्रास वापरली जातात, पण यामुळे आरोग्यासाठी काहीप्रमाणात नुकसान होऊ शकते

यामध्ये टॅफ्लॉन कोंटिंग केलेली भांडी वारंवार तापून त्‍यातील कोंटींगमधील केमिकलचे विषारी कण अन्नात मिसळू शकतात. तिच गोष्ट ॲल्यूमिनीयमच्या भांड्याबाबतही होते

पण याऐवजी काही प्रमाणात लोखंडी भांडी वापरली तर तवा किंवा कढईत अन्न शिजवताना त्यातील लोहाचे (Iron) सूक्ष्म अंश अन्नात मिसळतात. हे शरीरासाठी खूप पोषक ठरतात

लोखंडी भांडी वापरल्याने लोखंडाचा काही अंश शरीरात जातो यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते आणि ॲनिमियाचा धोका कमी होतो.

पुर्वीच्या काही किंवा आपली आजी आजोबा हे लोखंडी भांड्यात जेवण करायचे तवा वापरायचे यामुळे त्‍यांना ॲनिमियारसाखे आजार माहितीच नव्हते

लोखंडी भांडे चांगले तापल्यानंतर अन्न तळाला चिकटत नाही. यामुळे भाजी, चपाती किंवा डोसा बनवण्यासाठी खूप कमी तेल किंवा तूप लागते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

लोखंड उष्णता दीर्घकाळ टिकवून ठेवते आणि सर्व बाजूंनी समान उष्णता देते. यामुळे अन्न व्यवस्थित शिजते, करपत नाही आणि जेवणाला एक पारंपरिक, चविष्ट चव मिळते.

इतर भांड्यांच्या तुलनेत लोखंडी भांडी वर्षानुवर्षे टिकतात आणि खराब होत नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ही भांडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा म्हणून वापरली जाऊ शकतात.

आधुनिक कोटिंग असलेली भांडी जास्त उष्णतेवर विषारी धूर सोडतात. लोखंडी भांडी अतिउष्णतेवरही सुरक्षित राहतात, त्यामुळे बेकिंग, डीप फ्राय किंवा तंदूरसारख्या पाककृतींसाठी उत्तम ठरतात.

लोखंडी भांड्यांमध्ये टोमॅटो, लिंबू, चिंच किंवा आमसूल यांसारखे जास्त आंबट पदार्थ शिजवणे टाळा, कारण ॲसिडमुळे जेवणाची चव बदलू शकते.

लोखंडी भांडी मंद व मध्यम आचेवर अन्न व्यवस्थित शिजवतात. त्यामुळे अन्नातील जीवनसत्त्वे (Vitamins) आणि पोषक तत्त्वे जळून नष्ट न होता टिकून राहतात.