Namdev Gharal
इराणमधील एक असे अनोखे गाव वसले आहे. ज्याची रचना अनेकांना अचंबित करते कारण या गावात सर्वसामान्य रस्तेच नाहीत, तर एका घराचे छत म्हणजेच दुसऱ्या घराचा रस्ता आहे
हे गाव म्हणजे अल्बोर्झ पर्वतांच्या कुशीत बसलेले 'मासुलेह' , हे त्याच्या अद्भूत वास्तुकलेसाठी (Architecture) जगभरात प्रसिद्ध आहे.
हे गाव अल्बोर्झ पर्वतरांगांच्या उतरणीवर वसलेले आहे. या गावाची रचना पायऱ्यांसारखी आहे. या गावात खालील घराचे छत म्हणजे वरील घरासाठी अंगण किंवा सार्वजनिक रस्ता म्हणून वापरले जाते.
वाहनांना पूर्ण बंदी : अरुंद गल्लीबोळ आणि पायऱ्यांमुळे या गावात गाड्या, बाईक किंवा सायकली आणण्यास सक्त मनाई आहे. इराणमधील हे पेडेस्ट्रियन-ओन्ली (चालत फिरणे) गाव आहे."
८०० वर्षांपूर्वीचे गावः या ऐतिहासिक गावाची स्थापना साधारणपणे ११ व्या शतकात (इ.स. १०६०) झाली असून त्याला प्रदीर्घ इतिहास लाभला आहे.
पिवळी माती घरे बांधण्यासाठीः येथील घरे बांधण्यासाठी एका विशेष पिवळ्या मातीचा वापर केला जातो, ज्यामुळे धुक्यातही घरे सहज दिसतात.
समुद्रसपाटीपासून सुमारे १४५० मीटर उंचीवर वसलेले हे गाव बहुतांश काळ हिरवळ आणि धुक्याने वेढलेले असते. त्यामुळे येथील हवामान अतिशय आल्हाददायक आहे.
येथील पारंपरिक लाकडी खिडक्या, हस्तकला, लोकरीचे कपडे आणि इराणी चहा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.