Intestine Problems: आतड्यांच्या आरोग्यासाठी 'या' सवयी असतात घातक
पुढारी वृत्तसेवा
आतडे हा आपल्या पचनसंस्थेचा प्रमुख भाग आहे. सेवन केलेल्या आहाराचे पचन आणि अवशोषण हे आतड्यांमध्येच होत असते.
त्यामुळे तंदुरूस्तीसाठी आतड्यांच्या समस्या जाणून घेणे अधिक गरजेचे आहे.
शरीराच्या गरजेपेक्षा जास्त आहार घेणे, जास्त तळलेले, तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे अतिसेवन यामुळे आतड्यांवर अतिरिक्त ताण पडतो आणि पचनाची क्रिया मंदावते.
रात्री जास्त आणि पचनाला जड आहार घेणे तसेच जेवल्यानंतर लगेच खूप पातळ पदार्थांचे सेवन करणे यामुळे पाचक रसांची कार्यक्षमता कमी होते आणि आतड्यांचे आरोग्य बिघडते.
तणाव आणि अनिद्रा यामुळेही आतड्यांचे आरोग्य बिघडते.
शारीरिक सक्रियता कमी होणे, जास्त तणाव आणि अनिद्रा यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्याचा थेट परिणाम आतड्यांच्या आरोग्यावर होतो.
Sleep | Pudhari
सकाळी न्याहारी न करणे आणि दोन जेवणांत खूप मोठे अंतर ठेवणे यामुळे आतड्यांना पोषक घटक मिळत नाहीत, ज्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते आणि पचनक्रिया बिघडते.
आतड्यांच्या सामान्य कार्यात बाधा आल्यास पचन तंत्र बिघडणे, झोप न लागणे, सतत थकवा जाणवणे आणि त्वचेशी निगडीत समस्या निर्माण होणे अशा समस्या उद्भवू शकतात.