पुढारी वृत्तसेवा
प्रत्येक विमानाच्या सीटचा रंग हा निळाच का असतो? याबाबत एका एअर होस्टेसने माहिती दिली आहे.
त्यामागे तीन प्रमुख कारणे आहेत.
पहिले कारण म्हणजे मेंटेनन्स. दुसरे महत्त्वाचं कारण म्हणजे मानसशास्त्र आणि तिसरे ब्रँडिंग.
कोणत्याही विमानाच्या उड्डाणापूर्वी एअर लाईन्सच्या स्टाफकडे अत्यंत कमी वेळ असतो.
त्यामुळे विमानाच्या सीटला पडलेले डाग किंवा खराब झालेले सीट हे लवकर नजरेस पडावे, जास्त श्रम वाया न जाता त्याची लगेचच स्वच्छता व्हावी यासाठी विमानाचे सीट हे निळ्या रंगाचे असते.
आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे अनेकजण पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असतात.
विमानाने उड्डाण करताच त्यांना भीतीही वाटते. अशा स्थितीमध्ये रंगाचा तुमच्या मनावरदेखील परिणाम होत असतो.
निळा रंग हा सर्वसामान्यपणे भरोसा आणि शांतीचे प्रतीक आहे. यामुळे प्रवाशांना धीर मिळतो.
निळा रंग मुळातच आकर्षक असतो. त्यामुळे विमानदेखील आकर्षक दिसते आणि विमानाचे ब्रँडिंगही होण्यास मदत होते.