Instant Soft Idli Recipe | इडलीसाठी पीठ आंबवण्याची कटकट मिटली! 'या' मॅजिक पावडरच्या मदतीने 30 मिनिटांत बनवा मऊ इडली

पुढारी वृत्तसेवा

झटपट इडली बनवण्याची ट्रिक
घरात इडली बनवण्यासाठी अनेकदा पीठ भिजवून आंबवावं लागतं. पण एका खास पावडरच्या मदतीने तुम्ही ३० मिनिटांत मऊ इडली बनवू शकता.

idli

लागणारे साहित्य
रवा (सूजी), दही, मीठ, पाणी आणि एक खास घरगुती इडली पावडर.

idli

पावडर कशी बनवायची?
१ कप पोहे, २ चमचे तांदळाचे पीठ आणि १/२ चमचा बेकिंग सोडा मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करा.

idli

पीठ तयार करा
एका भांड्यात रवा, दही, मीठ आणि थोडं पाणी घालून घट्ट पीठ तयार करा.

idli

पावडर मिसळा
तयार केलेली पावडर त्यात घालून चांगलं मिक्स करा आणि १०-१५ मिनिटं ठेवून द्या.

idli

इडली प्लेट तयार करा
इडलीच्या साच्याला थोडं तेल लावून त्यात तयार पीठ घाला.

idli tips

वाफेवर शिजवा
इडली कुकर किंवा स्टीमरमध्ये १०-१२ मिनिटं वाफेवर शिजवा.

idli

मऊ आणि स्पॉंजी इडली तयार
अगदी रेस्टॉरंट-स्टाईल मऊ, हलकी आणि स्पॉंजी इडली तयार होईल.

idli

चटणी-सांबारसोबत सर्व्ह करा
गरमागरम इडली नारळाची चटणी आणि सांबारसोबत सर्व्ह करा.

idli
Jaggery : रोज एक गुळाचा खडा खाण्याचे चमत्‍कारिक फायदे... | File Photo
<strong>येथे क्लिक करा...</strong>