पुढारी वृत्तसेवा
भूक न लागणे, अपचन होणे किंवा सतत आंबट ढेकर येणे या समस्यांवर निसर्गाकडे सोपे उपाय आहेत. चला जाणून घेऊया काही घरगुती उपाय!
अर्धा ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून त्यात थोडी साखर मिसळा. हे मिश्रण नियमित प्यायल्याने पोटातील जळजळ कमी होते आणि पचन सुधारते.
एक चमचा आल्याचा रस, लिंबू आणि थोडे सेंधा मीठ एका ग्लास पाण्यात मिसळून प्या. यामुळे भूक वाढते आणि गॅसेसचा त्रास कमी होतो.
अजीर्ण दूर करण्यासाठी अननसाच्या फोडींवर साधे मीठ आणि काळे मीठ टाकून खा.
पपई खाल्याने पण अजीर्णा मध्ये आराम येतो.
एक चमचा कांद्याचा रस दोन-दोन तासाने घेतल्यास अजीर्ण बरे होते.
लाल कांद्यावर लिंबू पिळून जेवतांना खाल्यास अजीर्ण दूर होते.
लहान मुलांना अजीर्ण झाल्यास पाच थेंब कांद्याचा रस दिल्यास आराम येतो. (हे उपाय घरचा वैद्य या पुस्तकात दिले आहेत. तज्ञांचा सल्ला महत्वाचा.)