रणजित गायकवाड
विदेशात सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या अव्वल 6 भारतीय खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरपासून ते केएल राहुलपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.
राहुलने माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचा विक्रम धोक्यात आणला आहे.
महान फलंदाज सचिन तेंडुलकर विदेशी भूमीवर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय आहे.
सचिनने त्याच्या कारकिर्दीत देशाबाहेर 106 सामन्यांमध्ये 29 शतके झळकावली.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड आहेत.
द्रविडने विदेशात 91 कसोटी सामन्यांमध्ये 21 शतके झळकावली.
माजी भारतीय दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी विदेशी भूमीवर कसोटीत एकूण 18 शतके झळकावली.
त्यांनी देशाबाहेर 61 सामने खेळले, ज्यात त्यांची सर्वोच्च 221 आहे.
या यादीत चौथ्या स्थानावर स्टार फलंदाज विराट कोहली आहे. त्याने परदेशी भूमीवर 68 कसोटी सामन्यांमध्ये 16 शतकी खेळ्या केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 200 आहे.
माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने देशाबाहेर 51 कसोटी सामन्यांमध्ये 10 शतके झळकावली आहेत.
सेहवागची सर्वोच्च धावसंख्या 309 आहे, जी त्याने 2004 मध्ये पाकिस्तानविरुद्ध मुलतान येथे केली होती.
या यादीत केएल राहुल संयुक्तपणे सहाव्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत परदेशात 41 कसोटी सामन्यांमध्ये 9 शतके झळकावली आहेत.
त्याने त्याच्या एकूण 10 कसोटी शतकांपैकी केवळ एक शतक मायदेशात फटकावले आहे.
इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत राहुलने 6 डावांमध्ये 62.50 च्या सरासरीने 375 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे.
मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्ये राहुलने किमान एक शतक झळकावल्यास, तो माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा विक्रम मोडेल.
लक्ष्मणने आपल्या कसोटी कारकिर्दीत परदेशात 9 शतके झळकावली होती. भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना बुधवार (23 जुलै) पासून मँचेस्टर येथे सुरू होईल.