पुढारी वृत्तसेवा
इंडियन टॉयलेट आणि वेस्टर्न टॉयलेट तसे दोघांचेही फायदे-तोटे आहेत.
कमोड वापरतात तिथ जोर दिल्यामुळे स्नायूंवर ताण पडल्याने हरणिया, पाइल्स, फिशर, भगंधर, सारखे आजार होण्याची शक्यता असते.
इंडियन टॉयलेट असेल तर आजूबाजूच्या मसल्सवर ताण येणार नाही. नैसर्गिक जोर पडल्याने मलविसर्जन सोपे होते.
भारतीय टॉयलेट साफ किंवा फ्लश व्हायला वेळ घेत नाही. वेस्टर्न टॉयलेट लगेच फ्लश होत नाहीत. बऱ्याचवेळा खराब होतात.
सार्वजनिक ठिकाणी भारतीय टॉयलेट योग्य, शरीराचा थेट संपर्क टॉयलेट सीटशी होत नाही. त्यामुळे युरीन इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
वेस्टर्न टॉयलेटमध्ये शरीराचा संपर्क थेट सीटशी येत असल्यामुळे विविध प्रकारच्या संसर्गाचा धोका वाढतो.
वेस्टर्न टॉयलेटमध्ये पेपर टॉयलेट रोल वापरला जातो, तर भारतीय टॉयलेटमध्ये पाण्याचा वापर होतो, ज्यामुळे भारतीय टॉयलेट स्वच्छ मानलं जातं.
भारतीय शौचालय प्रमाणे वेस्टर्न टॉयलेटमध्ये पोट आणि पचनसंस्थेवर दबाव येत नाही. त्यामुळे वेस्टर्न टॉयलेट्समुळे अनेक वेळा लोकांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही अशी तक्रार होते.
वेस्टर्न टॉयलेट वापरण्याचे फायदेही आहेत. ज्यांना गुडघ्याचा किंवा पाठीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी वेस्टर्न टॉयलेट चांगले आहे.
वृद्ध, शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठीही वेस्टर्न टॉयलेट वापरणं सोपं ठरतं. लहान मुलांसाठी देखील वेस्टर्न टॉयलेट अधिक सोयीस्कर ठरते.