पुढारी वृत्तसेवा
भारतीय चलनी नोटांवर वरच्या बाजूला डावीकडे आपण अनेकदा A, B, C, D किंवा E अशी अक्षरे पाहतो.
सर्वसामान्यपणे याला सीरियल नंबरचा भाग मानले जाते. परंतु या अक्षरांमागे नोटेच्या छपाई केंद्राचे नाव दडलेले असते.
भारतात चलनी नोटांची छपाई मुख्यत्वे पाच सरकारी प्रेसमध्ये केली जाते आणि प्रत्येक केंद्राला एक विशिष्ट अक्षर नेमून दिलेले असते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सुरक्षा यंत्रणांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असते.
नोटेवर A अक्षर असल्यास ती देवास (मध्य प्रदेश) येथील प्रेसमध्ये छापलेली असते.
B अक्षर साळबनी (पश्चिम बंगाल) आणि C अक्षर म्हैसूर (कर्नाटक) येथील भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण केंद्राची ओळख पटवते.
त्याचप्रमाणे D अक्षर होशांगाबादच्या सिक्युरिटी पेपर मिलला दर्शवते आणि E अक्षर नाशिकच्या करन्सी नोट प्रेसचे निदर्शक असते.
या सांकेतिक अक्षरांमुळे नोट नेमकी कुठे तयार झाली आहे, हे तज्ज्ञांना एका नजरेत ओळखता येते.
विशेष प्रसंगी इतर प्रेसचा वापर होत असला तरी प्रामुख्याने हीच अक्षरे चलनात पाहायला मिळतात.