पुढारी वृत्तसेवा
मध्यपूर्व आशियातील तणापूर्ण स्थितीमुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन दिवसांनी वाढत आहेत.
गेल्या काही दिवसात जवळपास ७ रूपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
भारतात पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग कुठे आहे? जाणून घ्या
सोमवारी चौथ्यांदा दरवाढ झाल्यानंतर सर्वाधिक महाग पेट्रोल हैदराबादेत असून, त्याखालोखाल तिरुवनंतपुरम, पाटना, जयपूर, यांचा क्रम लागतो.
हैदराबादमध्ये पेट्रोलचे दर ११५.७३ रुपयांवर.
भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल चंदीगडमध्ये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण यामुळे तेल कंपन्यांचा आयात खर्च कमालीचा वाढला आहे.
जागतिक बाजारातील ही अस्थिरता अशीच राहिल्यास येत्या काळात सर्वसामान्यांना आणखी दरवाढीचे चटके सोसावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.