पुढारी वृत्तसेवा
23 जुलै १९५२ ला रचला इतिहास
खाशाबा दादासाहेब जाधव यांनी फिंलँड मधील हेलसिंकी येथे उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक कांस्य पदक जिंकून आंतराष्ट्रिय स्तरावर गौरवित केले.
घरातच कुस्तीचा इतिहास
खाशाबा यांचे वडिल एक विख्यात पैलवान होते तर आजोबाही मागे नव्हते. त्यांच्या परिसरात त्यांच्या घराण्याचे नाव विख्यात होते. घराची विकट परिस्थीती असतानाही वडिलांकडून कुस्ती शिकुन खाशाबांनी इतिहासात आपले नाव कोरले.
दुसर्या खेळ्यांन मध्येही पारंगता
फक्त कुस्तीच नाही तर मल्लखांब, हातोडीफेक, वेटलिफ्टींक मध्ये त्यांचा पारंगता होती.३
१९४८ ची हार
लंडन मध्ये झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये अगदी काही गुणांनी झालेली हार त्याच्या मनाला लागली होती आणि त्यातुनच जिंकण्याची जिद्द निर्माण झाली.
४ वर्षांची कसोटी
१९४८ ला लंडन ऑलिम्पिकला हारल्या नंतर सलग ४ वर्ष जिद्दीने कष्ट करुन १९५२ साली ३-० या गुणांनी भारताला पहिले कांस्य पदक मिळवूण दिले.
कराड मध्ये जल्लोष
पदक जिंकून आल्या नंतर गावकर्यांनी ५१ बैलगाड्यांनी कराड ते गोळेश्र्वर मध्ये मिरवणुक काढत जंगी स्वागत केल.
कुस्ती पाहायला गेले अन्
सुट्टीच्या दिवशी कुस्ती पाहायला गेले आणि अचानक त्यांच्या नावाची घोषणा झाली. पण गडबडून न जाता ते स्पर्धेत उतरले. पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्धी न आल्याने त्यांना बाय मिळाला. त्यानंतर खाशाबा यांनी एकएक करत कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांना चितपट केले.
जत्रेत जिंकली पहिली स्पर्धा
वयाच्या आठव्या वर्षी गोळेश्र्वर येथील रेठरे गावातील जत्रेत कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेत ते प्रथम आले होते आणि त्यांना बक्षीस म्हणून साखरेच्या बदामाचा हलवा दिला होता.
सब इंस्पेकटर म्हणून रुजु
१९५५ साली पोलिस सब इंस्पेकटर म्हणून कामाला रुजु झाले. पण तेथेही कित्येक स्पर्धा जिंकल्या.