IND vs ENG: रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम!

पुढारी वृत्तसेवा

भारताविरुद्ध हेडिंग्ले, लीड्स येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या रूटने भारत-इंग्लंड कसोटींमध्ये इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

इंग्लंड विरुद्ध कसोटीत तेंडुलकरने केलेल्या १,५७५ धावांचा विक्रम रूटला मागे टाकण्यासाठी केवळ दोन धावांची गरज होती.

तेंडुलकरने इंग्लंडमध्ये १७ कसोटी सामन्यांत चार शतके आणि आठ अर्धशतके झळकावले १,५७५ धावा केल्‍या होत्‍या. हा विक्रम रूटने १६ कसोटींमध्ये मोडित काढला आहे.

तेंडुलकरने इंग्लंडमध्ये १७ कसोटी सामन्यांत ४ शतके आणि ८ अर्धशतके झळकावले १,५७५ धावा केल्‍या होत्‍या. हा विक्रम रूटने १६ कसोटींमध्ये मोडित काढला.

रुटने भारताविरुद्ध इंग्लंडमध्ये आतापर्यंत सात शतके आणि पाच अर्धशतके आपल्‍या नावावर नोंदवली आहेत.

शेफिल्डमध्ये जन्मलेला रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा फलंदाज आहे.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकांमधील (घरच्या व परदेशातील दोन्ही मालिकांतील) सर्वाधिक धावांचा विक्रमही आपल्या नावे करत रुट अव्‍वल स्थानावर पोहोचला आहे.

हेडिंग्ले, लीड्स कसोटीदरम्यान आणखी १५४ धावा केल्यास रुट हा भारताविरुद्ध ३,००० कसोटी धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.

येथे क्‍लिक करा.