पुढारी वृत्तसेवा
प्रकृतीने प्रत्येक जीवाला बचावासाठी अनोख्या क्षमता दिल्या आहेत.
यातील एक वूल्वरिन फ्रॉग किंवा हेयरी फ्रॉग हा आफ्रिकेत आढळतो.
या बेडकाची आत्मसंरक्षणाची पद्धत अविश्वसनीय आहे.
हा बेडूक धोका जाणवताच आपल्याच शरीराची हाडं तोडून एक धारदार शस्त्र बाहेर काढतो.
हे दुसरेतिसरे काही नसून त्याचे पंजे असतात.
हे पंजे केरॅटिनचे नसून, त्याच्या पायाच्या हाडांचे रूपांतर असतात, जे त्वचा फाडून बाहेर येतात.
या पंजांमुळे होणाऱ्या खोल जखमांची माहिती कॅमेरूनमधील शिकाऱ्यांना आहे.
म्हणूनच ते त्याला पकडण्यासाठी भाले किंवा चाकू वापरतात. स्वतःच्या हाडांना तोडूनही हा बेडूकजिवंत राहतो; कारण त्याच्यात पुनर्जीवित होण्याची अद्भुत क्षमता आहे.
हा विचित्र जीव मध्य आफ्रिकेतील कॅमेरून, कांगो, नायजेरियासारख्या देशांमध्ये आढळतो.