Happy Birthday Imtiaz Ali: इम्‍तियाज अलीचे गाजलेले चित्रपट, कथेला संगीताची जोड

Namdev Gharal

जब वी मेट -Jab We Met (2007)

करीना कपूर, शाहिद कपूर यांच्या अभिनयाने नटलेला प्रेमकथांना नवसंजीवनी देणारा चित्रपट

हाय-वे, Highway (2014)

आलिया भट्ट, रणदीप हुड्डा या जोडीचा समाजातील बंधनांना झुगारुन आत्‍मशोध घेणारा चित्रपट

तमाशा -Tamasha (2015)

समाजाच्या अपेक्षांनुसार आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीचा स्वतःला शोधण्याचा मुझिकल प्रवास, रणबीर कपूर - दिपीका पदुकोण ची केमिस्‍ट्री यामध्ये पाहयला मिळते.

रॉकस्‍टार - Rockstar (2011)

एक गायक आपल्या प्रेम आणि संघर्षामुळे कसा Rockstar बनतो हे दाखवतं. रणबीर कपूरची जबरदस्‍त ॲक्‍टिंग व ए. आर. रेहमानचे अंगावर काटा आनणारे म्‍युझिक

जब हॅरी मेट सेजल - Jab Harry Met Sejal (2017)

प्रवासादरम्यान वाढणारं आत्मभान आणि प्रेम यांचा मिलाफ, शाहरुख व अनुष्‍काचा सुंदर अभिनय

लव्ह आज कल | Love Aaj Kal (2009)

दोन पिढ्यांमधील प्रेमकथा दाखवणारा चित्रपट, सैफ अलि खान व दिपीका पदुकोण ही जोडी यात पाहायला मिळते

लव्ह आज कल | Love Aaj Kal (2020)

2009 मध्ये आलेल्‍या Love Aaj Kal ची पुनर्रचना असून यामध्ये सारा अलि खान व कार्तिक आर्यन हे नव्या पढीचे कलाकार दिसले

सोचा ना था | Socha Na Tha (2005)

अभय देओल, आयेशा टाकिया यांची भूमिका असलेला हा इम्तियाज अलीचा पहिला चित्रपट होता. यामध्ये नात्यांची गुंतागुंत आणि आत्मशोध याचे चित्रण आहे.

चमकिला | Chamkila (2024)

पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांच्या जीवनावर आधारित बायोपिक. दिलजीत दोसांझ व परिणीती चोप्रा यांनी मुळ पात्रे हुबेहुब साकारली आहेत.