पुढारी वृत्तसेवा
उत्तम आरोग्यासाठी नियमित सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे.
केवळ झोपेचे प्रमाणच नाही तर झोप घेण्याच्या वेळेचादेखील हृदयाच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो, असे नवीन संशोधनातून दिसून आले आहे.
दररोज एका निश्चित वेळी झोपल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते.
'स्लीप ॲडव्हान्सेस' जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, रात्री झोपण्याची वेळ निश्चित असेल तर शरीर स्वतःची लय निश्चित करण्यास सक्षम असते.
झोपेचे चक्र बिघडते तेव्हा मेलाटोनिन हार्मोनचे उशीरा तर कॉर्टिसॉल चुकीच्या वेळी वाढू शकते, ज्यामुळे रक्तदाबाची नैसर्गिक लयही बिघडण्याची शक्यता असते.
संशोधनात अतिरिक्त वजन असणारे उच्च रक्तदाबाने ग्रस्तांचा समावेश होता.
संशोधनात सहभाग घेतलेल्यांना दोन आठवड्यांसाठी एका निश्चित वेळी झोपण्यास सांगण्यात आले. त्यांच्या झोपेचे तास सारखेच राहिले, परंतु त्यांच्या झोपेच्या वेळेत लक्षणीय चढ-उतार दिसून आले.
झोपेची वेळ निश्चित करण्याचे तसेच सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावली तर शरीराचे घड्याळ उत्तम रीतीने कार्य करेल, याकडे संशोधकांनी लक्ष वेधले आहे.