Flight Travel with baby: तुमच्या चिमुकल्यासोबत पहिल्यांदाच विमानप्रवास करताय तर मग या गोष्टी पाळाच
अमृता चौगुले
लहान मुलांसोबत प्रवास करणे अनेकदा पालकांसाठी अत्यंत आव्हानात्मक असते
विशेषत: मुले खेळकर असतील तर अनेकदा प्रवासात मुलांना सतत सांभाळत बसावे लागते
लहान मुले साधारण 2-3 महिन्यांची झाली की त्यांना घेऊन विमान प्रवास करणे योग्य असल्याचे अनेक तज्ञ सांगतात
अर्थात या संदर्भात काही विमान कंपन्यांचे नियमही वेगवेगळे आहेत. काही विमान कंपन्या 2 आठवड्याच्या तर काही एका आठवड्याच्या नवजात बाळासहित प्रवास करण्याची अनुमति देतात
टेक ऑफ आणि लॅंडींग दरम्यान बाळांच्या कानावर प्रेशर येऊ शकते. अशावेळी मुले रडू लागतात. हे टाळण्यासाठी टेक ऑफ आणि लॅंडींग दरम्यान बाळांना फीडिंग करण्याचा सल्ला दिला जातो.