पिवळी धम्मक केळी पाहून घेतांय, मग नक्कीच फसतांय...

पुढारी वृत्तसेवा

बाजारात केमिकलव्दारे पिकवलेली केळी विकायला येतात. यामुळे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

त्‍यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली केळी आणि केमिकलने पिकवलेली केळी ओळखणे महत्‍वाचे आहे.

देठाचा रंग : केमिकलने पिकवलेल्या केळीचा देठ गडद हिरवा असतो, पण केळी पूर्ण पिवळी धमक दिसते. तर नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीचे देठ आणि केळी दोन्ही पिवळसर किंवा काळपट दिसतात.

सालीचा रंग : केमिकलने पिकवलेली केळी पिवळी धमक आणि दिसायला स्वच्छ दिसतात, मात्र नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीचा रंग फिकट पिवळा असतो.

काळे ठिपके : केळी नैसर्गिकरित्या पिकली की त्यावर नैसर्गिक काळे ठिपके येतात. केमिकलने पिकवलेल्या केळी पूर्णपणे स्वच्छ आणि पिवळी दिसतात.

केळीची चव : केमिकलने पिकवलेली केळी चवीला कमी गोड लागतात आणि काही वेळा चव किंचित तुरट किंवा कडू असू शकते. नैसर्गिक केळी गोड लागतात.

पाण्यातील चाचणी : एक बादली पाणी घेऊन त्यात केळी टाका. जर केळी पाण्यावर तरंगली, तर ती नैसर्गिकरीत्या पिकलेली आहेत. जर केळी पाण्याच्या तळाला गेली, तर ती केमिकलने पिकवली आहेत.

वरील माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे. वाचकांनी आपल्या स्व:तच्या अनुभवातून कोणतीही कृती करणे गरजेचे आहे.