खरा मध 'असा' ओळखा अन् फसवणुकीपासून दूर रहा...

पुढारी वृत्तसेवा

मध आरोग्यासाठी उपयुक्त आहे. त्‍यामुळे त्‍याला चांगली मागणी असते.

1

नैसर्गिकरित्‍या मधमाश्यांच्या पोळ्यापासून तयार होणाऱ्या मधाची किंमत जास्त असते.

मागणी जास्त असल्याने बनावट मधाचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.

चोखंदळ ग्राहकांना पुढील काही टिप्स वापरून खरा मध ओळखता येतो.

एक ग्लास पाण्यात एक चमचा मध टाका. मध पाण्यात विरघळला किंवा तरंगला तर तो भेसळयुक्त आहे.

जर मध हळूहळू पाण्याच्या ग्लासच्या तळाशी जमा झाला, तर तो शुद्ध मध आहे.

एक टूथपिक मधात बुडवून पेटवा, जर ती लगेच पेटली तर मध खरा आहे

तुमच्या बोटावर मधाचा एक थेंब घ्या. जर मध पसरला तर तो बनावट, शुद्ध मध चिकट असतो, तो पसरत नाही.