Ice Fishing | याठिकाणी हातोडा घेऊन लोक जातात मासेमारी करण्यासाठी!

पुढारी वृत्तसेवा

हो जगात हिवाळ्यात अशी ठिकाणे आहेत की जिथे मोसमारी ही हातोड्याने केली जाते. ही ठिकाणे म्हणजे रशियातील सायबेरीया, उत्तरेकडीच चीनचा भाग

रशियातील सायबेरीया हा प्रांत जगात सर्वात जास्त थंड प्रदेश म्हणून ओळखला जातो. तसेच चिनचा रशियाकडील भागातही डिसेंबर आणि काळात तापमान -३०°C ते -५०°C असते

थंडीच्या दिवसात कमी झालेल्या तापमानामुळे. याठिकाणी असलेले तलाव नद्या सर्व गोठतात आणि या पाण्याबरोबरच त्‍यातील मासेही काहीवेळा गोठतात

हे गोठलेले मासे काढण्यासाठी लोक हातोड्या वापर करतात. हातोड्याने तलाव नदीत जमा झालेला बर्फ तोडतात गोठलेले मासे बाहेर काढतात

हा गोठलेला थर दोन ते तीन फुटांचाही असू शकतो. तसे या गोठलेल्या नदी तलावावर आरामात फिरता येथे लोक असेच फिरून गोठलेले मासे शोधतात

याठिकाणी मासे पकडणे हे खरे काम नाही तर बर्फ तोडणेच खरे काम असते. कारण त्‍याला खूप मेहनत लागते बर्फ फोडल्यानंतर मासे आरामात मिळतात

अनेक वेळा बर्फ तोडून एक मोठे छित्र तयार केले जाते त्‍यावर इन्सूलेटेड टेंट उभा केला जातो. व या छित्रात गळ टाकून बर्फाखालील पाण्यातील मासे पकडले जातात

सायबेरीयातील साखा किंवा याकुत जमाती प्रामुख्याने अन्नासाठी बर्फ तोडून मासेमारी करतात. ही केवळ मासेमारी नसून जगण्यासाठीचा एक मोठा संघर्ष आहे.

मायनस थंड तापमान असल्या प्रदेशातील बर्फ इतका घट्ट असतो की तो साध्या चाकूने किंवा लाकडाने तुटत नाही. यासाठी 'पेष्ण्या' (Peshnya) नावाचे एक जड लोखंडी साधन वापरले जाते