Human Body |मानवाचे शरीर कीती प्रमाणात थंडी सहन करु शकते ?

Namdev Gharal

मानवी शरीराचे सामान्य अंतर्गत तापमान साधारणपणे 37°C सेल्सिअस इतके असते.

यापेक्षा जास्त होत गेले तरी मानव ते सहन करु शकत नाही जास्तित जास्त 42 अंश सेल्सिअस आणि कमी असले तरीही मानवी शरीर ते सहन करु शकत नाही

सामान्य पणे 36 ते 37 अंश सेल्सिअसवर शरीर व्यवस्थित कार्य करते. सर्व अवयव योग्यरित्‍या काम करत असतात

यापेक्षा थोडे कमी झाले तर 35 ते 32 अंशाच्या आत आले तर तीव्र थंडी वाजून हात-पाय सुन्न होतात, श्वास जलद होतो आणि कामात गोंधळ उडतो.

मध्यम तापमान ३२°C - २८°C शरीर थरथरणे थांबते बोलणे अडखळते, प्रचंड डुलकी किंवा झोप येते आणि स्नायू ताठ होतात.

गंभीर तापमानात घट शरिराचे ताममान 28 ते 24 डिग्री पर्यंत गेल्यास व्यक्ती बेशुद्ध पडते, हृदयाचे ठोके आणि श्वास अत्यंत मंद होतो.

आणि जर मानवी शरिराचे तापमान २४°C च्या खाली गेल्यास हृदय बंद पडण्याची (Cardiac Arrest) दाट शक्यता असते आणि मृत्यू ओढवू शकतो.

त्‍यामुळे अतिथंड प्रदेशात लोक कपड्यांचे थरावर थर ठरतात व शरिर गरम ठेवण्याचा प्रयत्‍न करतात