Hormone activity in a day: मानवी शरीरात दिवसभरात कोणत्या क्षणी कोणतं हार्मोन्स अ‍ॅक्टीव्ह असतं?

मोनिका क्षीरसागर

सकाळी उठल्यावर कॉर्टिसोल हार्मोन सर्वाधिक सक्रिय असतं, जे उर्जा आणि सतर्कता वाढवतं.

सूर्योदयाच्या वेळी सेरोटोनिन स्त्रवायला लागतो, त्यामुळे मूड सुधारतो आणि मन प्रसन्न होतं.

नाश्त्यानंतर इन्सुलिन अॅक्टिव्ह होतं, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.

दुपारी डोपामिन आणि अॅड्रेनालिन वाढतात, यामुळे एकाग्रता आणि कामगिरी चांगली होते.

दुपारनंतर लेप्टिन हार्मोन भूक कमी करण्याचं काम करतं.

संध्याकाळी सूर्य मावळताच मेलॅटोनिन वाढायला सुरुवात होते, झोपेची तयारी होते.

रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा इन्सुलिन कार्यरत होऊन अन्नातील उर्जा पेशींमध्ये पोहोचवतो.

मध्यरात्री शरीर गाढ झोपेत असताना ग्रोथ हार्मोन सक्रिय होतं, पेशींची दुरुस्ती आणि वाढ घडते.

पहाटे ३ ते ४ च्या सुमारास कॉर्टिसोल हळूहळू वाढायला सुरुवात करतं, जे तुम्हाला जागं करण्यासाठी शरीराची तयारी करतं.

येथे क्लिक करा...