Namdev Gharal
जगातील सुनियोजित व श्रीमंत गाव म्हणजे चीनमधील 'हुआशी' (Huaxi) गाव, याठिकाणी प्रत्येक नागरिक करोडपती आहे
हुआशी गाव हे चीनच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या जिआंगसू (Jiangsu) या अत्यंत समृद्ध आणि प्रगत प्रांतात येते. हा प्रांत चीनमधील व्यापार आणि उद्योगांचे मोठे केंद्र मानला जातो.
या गावाचे सर्वात मोठे वैशिष्टये म्हणजे प्रत्येकाला राहण्यासाठी स्वतंत्र 'युरोपियन स्टाईल' व्हिला (बंगले) दिलेला आहे, प्रत्येक घराचे क्षेत्रफळ सरासरी ४,५०० ते ५,००० स्क्वेअर फूट (किमान ४५० स्केअर मीटर) इतके मोठे आहे.
हे बंगले आधुनिक 'युरोपियन आर्किटेक्चर' शैलीमध्ये बांधण्यात आले असून त्यांना लाल रंगाची छपरे आहेत. प्रत्येक घराला स्वतःचे पार्किंग आणि छोटा बगीचा आहे.
कधी झाली स्थापना? : १९६१ मध्ये 'वू रेनबाओ' (Wu Renbao) यांनी या गावाची स्थापना केली. सुरवातीला हे अवघ्या ६०० लोकांचे एक अत्यंत गरीब आणि सामान्य शेतकरी गाव होते.
आज हे गाव शेतीवर नाही तर पूर्णपणे उद्योगांवर चालते. गावाने १९७०-८० च्या दशकात कापड उद्योग, पोलाद (Steel) आणि लोखंड कारखानदारीत मोठी झेप घेतली आणि गावाचे रूपांतर 'इंडस्ट्रियल हब'मध्ये झाले.
१९९४ मध्ये गावाने सर्व कंपन्या एकत्र करून 'हुआशी ग्रुप कॉर्पोरेशन' स्थापन केले. हे गाव एका मोठ्या 'कम्युनिस्ट कॉर्पोरेट'सारखे काम करते.
इथल्या प्रत्येक मूळ रहिवाशाच्या बँक खात्यात किमान १ ते २.५ लाख डॉलर्स (सुमारे ८० लाख ते २ कोटी रुपये) जमा असतात. वार्षिक नफ्यातील २०% हिस्सा बोनस म्हणून थेट नागरिकांमध्ये वाटला जातो.
गावातील प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य सेवा (Healthcare), मोफत शिक्षण, मोफत घर, जीवन विमा आणि महागड्या गाड्या (जसे की BMW, Audi) प्रशासनातर्फे पुरवल्या जातात.
इथला नियम अत्यंत कडक आहे—जर एखाद्याने गाव सोडण्याचा निर्णय घेतला, तर त्याचे घर, गाडी आणि बँक खात्यातील सर्व पैसे जप्त केले जातात. तसेच गावात जुगार आणि ड्रग्जवर पूर्ण बंदी आहे.
गावाच्या श्रीमंतीचे प्रतीक म्हणून येथे ३२८ मीटर उंच Longxi International Hotel ही ७२ मजली इमारत उभारण्यात आली आहे, ज्यामध्ये शुद्ध सोन्याची बनवलेली बैलाची मूर्ती आहे.
हुआशी गावाला चीनमध्ये 'आकाशाखालील नंबर १ चे गाव' म्हटले जाते. साम्यवाद आणि भांडवलशाहीचा हा अजब मेळ जगाला थक्क करणारा आहे!