Silk Saree Washing Tips: सिल्क साडी घरी कशी धुवावी? साडी कायम राहील नव्यासारखी!

पुढारी वृत्तसेवा

लग्नकार्य, सण-समारंभ किंवा पार्टी म्हटलं की महिलांची पहिली पसंती असते ती म्हणजे कपाटातील सिल्क किंवा भरजरी बनारसी साडी.

Pinterest

या साड्या दिसायला जितक्या सुरेख असतात, तितकीच त्यांची काळजी घेणं जिकिरीचं असतं. साडीवर चुकून एखादा डाग पडला की तो काढण्यासाठी ड्राय क्लीनिंगशिवाय पर्याय उरत नाही.

काही सोप्या घरगुती टीप्स वापरून तुम्ही तुमच्या महागड्या साड्यांची चमक कायम ठेवू शकता. जाणून घ्या घरी साड्या स्वच्छ करण्याच्या खास टिप्स:

साडीवरील डाग काढण्यासाठी लिंबाचा रस अत्यंत प्रभावी ठरतो. डाग पडलेल्या भागावर लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून थोडा वेळ तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने तो भाग स्वच्छ करा.

lemon | canva

लिंबाचा रस थेट डागावर वापरण्यापूर्वी साडीच्या एका कोपऱ्यावर वापरून चाचणी नक्की करा. जर कापडाचा रंग किंवा पोत खराब होत नसेल, तरच हा प्रयोग करा.

lime and lemon | canva

सिल्कसाठी सामान्य वॉशिंग पावडर वापरू नका. त्याऐवजी 'बेबी शॅम्पू' किंवा 'सिल्क लिक्विड क्लीनर' वापरा, ज्यामुळे साडीचे धागे सुरक्षित राहतील.

एका टबमध्ये थंड पाणी घेऊन त्यात थोडे लिक्विड मिसळा. साडी जास्त वेळ पाण्यात न ठेवता फक्त ५ मिनिटांनी बाहेर काढा.

साडीवर जरीकाम किंवा वर्क असल्यास ती हाताने रगडू नका किंवा ब्रश वापरू नका. हलक्या हाताने पाण्यात वर-खाली करून साडी स्वच्छ करा.

साडी स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर ती कधीही कडक उन्हात वाळत घालू नका. कडक उन्हामुळे साडीचा रंग फिका पडू शकतो. साडी नेहमी सावलीतच वाळत घालावी.

या साध्या पण प्रभावी पद्धतींचा अवलंब केल्यास तुमच्या सिल्क आणि बनारसी साड्या वर्षानुवर्षे नव्यासारख्या चमकत राहतील आणि ड्राय क्लीनिंगचा खर्चही वाचेल.