पुढारी वृत्तसेवा
कोल्हापुरी चप्पलची तिच्या विशिष्ट बांधणी आणि कलात्मकतेमुळे एक वेगळी ओळख आहे.
पुरुष आणि महिलांच्या चपलांच्या संग्रहात एक कोल्हापुरी हमखास असतेच.
पारंपरिक पोशाख कुर्ता आणि पायात कोल्हापुरी पायतानं हा पेहराव एक रूबाबदार लुक देतो.
कोल्हापुरी पायतान (चपला) या ओरिजनल चामड्यापासून बनवल्या जातात. ज्या आरामदायक, टिकाऊ आणि विविध डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत.
कोल्हापुरी चप्पलची योग्य पद्धतीने देखभाल घेतल्यास त्याचा टिकाऊणा वाढतो. त्याची कशी काळजी घ्यायची ते जाणून घ्या...
कोल्हापुरी चपलांवरील धुळ वेळच्यावेळी ब्रश किंवा कापडाने स्वच्छ करणे आवश्यक यामुळे चामड्यावर बुरशी येत नाही.
कोल्हापुरी चप्पल नरम ठेवण्यासाठी त्यावर खोबरेल तेल लावता येते. बुरशी लागू नये यासाठी उन्हात वाळवून कोरड्या जागेत ठेवा.
कोल्हापुरी चपला कागदात गुंडाळून कापडी पिशवीत बांधून हवेशीर जागेवर ठेवाव्यात.