Hiccups Ayurvedic Remedies: उचकी लागत असेल तर 'या' ३ गोष्टी नक्की करा

पुढारी वृत्तसेवा

काही लोकांना उचक्या सतत येत असतात. तर काहींना मात्र कधीतरीच एखाद्या वेळी उचकी येते.

श्वसननलिका आणि फुफ्फुसांच्या आतील भागातील स्नायूंच्या अनियंत्रित आकुंचन पावण्याच्या क्रियेला आपण उचकी असं म्हणतो.

डॉक्टरांच्या मते उचक्या येणे यामध्ये काळजी करण्यासारख काही कारण नसतं. काही वेळाने या उचक्या आपोआप थांबू शकतात. पण नाही थांबल्या तर काही उपाय करावे.

वारंवार उचकी लागत असेल तर सोपे घरगुती उपाय नक्की करून पहा!

सुंठ पाण्यात व्यवस्थित उगाळून घ्या. त्याचा वास घेतल्याने उचकी थांबण्यास मदत होते.

आल्याचे लहान लहान तुकडे करून चघळावे.

पेटलेल्या कोळशावर कापूर टाकून हुंगल्याने उचकी थांबते.

कापराचा विशिष्ट सुगंध आणि कोळशाचा धूर श्वासावाटे शरीरात गेल्याने उचकी लगेच थांबते.

उचक्या दोन दिवसांपेक्षाही जास्त काळ असल्यास ही गंभीर बाब मानली जाते. अशा स्थितीत तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.