Dental Care Tips: दात किडू नयेत म्हणून घरच्या घरी ‘हे’ उपाय करा

पुढारी वृत्तसेवा

आरोग्याच्या इतर समस्यांइतकेच दातांचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. कारण पचनक्रियेची सुरुवात दातांपासूनच होते.

सुरुवातीच्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे त्रास वाढतो. अलीकडे दंत उपचार वेदनारहित पद्धतीने केले जातात.

दाढ किडली की ती काढून टाकावी लागते हा गैरसमज आहे. रूट कॅनॉल आणि कॅपिंगद्वारे दात वाचवता येतात.

दातांवर काळे डाग दिसणे, खड्डा पडणे किंवा थंड-गोड खाताना कळ येणे ही कीड लागल्याची लक्षणे आहेत.

चांदीच्या जागी आता दातांच्या रंगाचे 'कॉम्पोझिट' सिमेंट वापरले जाते. यात असणारे फ्लोराईड दात अधिक किडण्यापासून वाचवते.

घरगुती काळजी

रोज सकाळी आणि रात्री योग्य पद्धतीने दात घासावेत.

काहीही खाल्लं तरी खळखळून चूळ भरावी. कारण अन्नकण दातांमध्ये अडकून पडल्यानंतर ते कुजतात आणि त्यामुळे दात किडतात.

डॉक्टरांकडून नियमितपणे दातांची तपासणी करून घ्यावी. म्हणजे वेळीच उपचार होऊ शकतात आणि भविष्यात त्रास वाचू शकतो.

दातांबद्दलच्या तपासण्यांबाबत आपण तितकेसे जागरूक नसतो. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात बरेचसे त्रास उद्भवू शकतात.

म्हणून हे दुखणं कमी असतानाच काळजी घेणे शहाणपणाचं ठरतं.