Bad Dreams: रात्री भयानक स्वप्ने पडत असतील तर काय करावे? स्वप्न शास्त्रातील ५ उपाय

पुढारी वृत्तसेवा

प्रत्येक व्यक्ती रात्री झोपताना काही ना काही स्वप्न नक्कीच पाहते. काही स्वप्ने चांगली असतात तर काही अत्यंत भयानक.

काही स्वप्ने इतकी भीतीदायक असतात की माणूस अचानक घाबरून जागा होतो. वारंवार पडणाऱ्या अशा स्वप्नांमुळे रात्रीची झोपही उडून जाते.

स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. स्वप्ने ही भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत मानली जातात. तसेच कुंडलीतील अशुभ ग्रहांच्या प्रभावाशीही याचा संबंध जोडला जातो.

ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात या स्वप्नांची कारणे आणि त्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

१. उशीखाली चाकू किंवा लोखंडी वस्तू ठेवा

जर तुम्हाला भयानक स्वप्ने पडत असतील, तर रात्री झोपताना तुमच्या उशीखाली चाकू किंवा लोखंडाची कोणतीही अणकुचीदार वस्तू ठेवून झोपा. हा उपाय काही दिवस केल्यास तुम्हाला भयानक स्वप्नांपासून सुटका मिळेल.

२. पिवळ्या तांदळाचा वापर

जर रात्री भीतीदायक स्वप्ने तुम्हाला त्रास देत असतील, तर डोक्याखाली पिवळे तांदूळ ठेवून झोपा. तांदळात थोडी हळद मिसळून ते पिवळे करा. हा उपाय सलग काही दिवस करा, यामुळे रात्री पडणारी वाईट स्वप्ने बंद होतील.

३. वेलचीचा उपाय

अनेकांना स्वप्न पाहून घाबरून उठून बसण्याची सवय असते. अशा परिस्थितीत हिरवी वेलची तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. रात्री झोपण्यापूर्वी एका कपड्यात वेलची बांधून उशीखाली ठेवा. असे केल्याने वाईट स्वप्ने पडणे थांबते.

वेलचीचे आरोग्यदायी फायदे | (Canva Photo)

४. तांब्याच्या भांड्यातील पाणी

भयानक स्वप्नांमुळे जर तुमची झोप वारंवार मोडत असेल, तर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून तुमच्या पलंगाखाली ठेवा. सकाळी उठल्यानंतर ते पाणी कुंडीत किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाका. यामुळे तुमची ही समस्या दूर होईल.

५. स्वच्छता आणि इतर खबरदारी

झोपण्यापूर्वी हे नक्की तपासा की तुमच्या बेडखाली जोडे किंवा चप्पल तर नाहीत ना? हे देखील वाईट स्वप्नांचे कारण असू शकते.

याशिवाय, झोपण्यापूर्वी तुमचा बेड व्यवस्थित स्वच्छ करा आणि पाय धुवूनच झोपा. या उपायांमुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि स्वप्नांचा त्रास कमी होईल.