Stretch marks removal: स्ट्रेच मार्क्स कसे घालवायचे? ३ सोपे कोरियन उपाय

पुढारी वृत्तसेवा

वजन वाढणे किंवा कमी होणे, गर्भधारणा किंवा हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर अनेकदा स्ट्रेच मार्क्स दिसतात.

Stretch marks

हे मार्क्स कमी करण्यासाठी एका कोरियन फार्मासिस्ट ३ प्रभावी उपाय सांगितले आहेत.

Stretch marks

१. दररोज मॉइश्चरायझर लावा

स्ट्रेच मार्क्स असलेल्या भागावर दररोज मॉइश्चरायझर किंवा सेरामाइड्स / पॅन्थेनॉल असलेली क्रीम वापरणे फायदेशीर ठरते.

हे घटक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात. त्वचा कोरडी न राहता आर्द्र राहिल्याने ती स्वतःहून बरी होण्यास मदत होते.

२. रात्री रेटिनल किंवा ट्रेटिनॉइन वापरा

जुने स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी रात्री रेटिनल किंवा ट्रेटिनॉइनसारखे रेटिनॉइड्स लावा.

यामुळे नवीन त्वचेच्या पेशींची निर्मिती होते आणि कोलेजन उत्पादनास चालना मिळते.

प्रथमतः पॅच टेस्ट नक्की करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भधारणेदरम्यान रेटिनॉइड्स वापरू नका.

३. संयम आणि सातत्य

तज्ज्ञांच्या मते, स्ट्रेच मार्क्स पूर्णपणे कमी होण्यास वेळ लागतो. विशेषतः पांढरे स्ट्रेच मार्क्स लवकर कमी होत नाहीत, त्यामुळे संयम आणि सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

त्वचेची नियमित योग्य काळजी घेतल्यास स्ट्रेच मार्क्स लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होते.