पुढारी वृत्तसेवा
रेझरचा योग्य वापर करा
जुना पण स्वच्छ रेझर हलक्या हाताने कापडावर फिरवा, गोळे सहज निघतात.
कंगवा किंवा ब्रश उपयोगी ठरतो
जाड दातांचा कंगवा किंवा हार्ड ब्रशने घासल्यास गोळे सुटतात.
इलेक्ट्रिक लिंट रिमूव्हर वापरा
हा सर्वात सुरक्षित व सोपा पर्याय असून कपड्यांना नुकसान होत नाही.
सँडपेपरचा हलका स्पर्श
बारीक सँडपेपर अतिशय हलक्या हाताने वापरल्यास गोळे निघून जातात.
व्हेलक्रो टेपचा उपाय
बॅग किंवा चपलेवर असलेली व्हेलक्रो टेप गोळे खेचून काढते.
कपडे उलटे करून धुवा
धुताना कपडे आतून बाहेर करून धुतल्यास गोळे कमी येतात.
मशीनमध्ये जास्त घास टाळा
जास्त स्पिन व जास्त कपड्यांमुळे गोळे लवकर तयार होतात.
सॉफ्टनरचा वापर करा
फॅब्रिक सॉफ्टनरमुळे कापड मऊ राहते आणि गोळे कमी होतात.
स्वेटर फोल्ड करून ठेवा, टांगल्यास ताण येऊन गोळे पडतात.