Bitter Gourd Bitterness: कारल्याच्या कडूपणा कमी करण्याच्या ७ भन्नाट टिप्स

Anirudha Sankpal

व्यवस्थित सोलणे

कारल्याच्या वरचा खडबडीत भाग सुरीने व्यवस्थित खरवडून काढावा, यामुळे वरच्या थरातील कडूपणा कमी होण्यास मदत होते.

बिया काढणे

कारले चिरल्यानंतर त्यातील निबर आणि कडव्या बिया पूर्णपणे काढून टाकाव्यात, ज्यामुळे भाजीची चव सुधारते.

मिठाचा वापर

कारल्याच्या फोडींना मीठ लावून ३० मिनिटे ठेवा आणि नंतर पिळून पाणी काढून टाका; हा कडूपणा घालवण्याचा सर्वात जुना व प्रभावी मार्ग आहे.

मिठाच्या पाण्यात उकळणे

गॅसवर पाणी उकळून त्यात मीठ आणि कारल्याच्या फोडी टाकून ५ मिनिटे उकळवा, यामुळे कडवटपणा पाण्यावाटे बाहेर पडतो.

व्हिनेगरचा वापर

दोन चमचे व्हिनेगर मिश्रित पाण्यात कारल्याच्या फोडी ३० मिनिटे भिजवून ठेवल्यास त्यातील उग्रपणा कमी होतो.

दही प्रक्रिया

कापलेले कारले एक तास दह्यात घोळवून ठेवल्यास दह्यातील आंबटपणामुळे कारल्याचा कडवटपणा शोषला जातो.

डीप फ्राय

कारल्याची भाजी करण्यापूर्वी फोडी तेलात तळून (Deep Fry) घेतल्यास त्यातील कडवट घटक नष्ट होऊन भाजी खुसखुशीत लागते.

साखर आणि व्हिनेगर

साखर आणि व्हिनेगरच्या मिश्रणात कारले काही वेळ ठेवल्यास त्यातील कडूपणा जाऊन चव संतुलित होते.

पोषक तत्वांची खात्री

या पद्धती वापरूनही कारल्यातील व्हिटॅमिन ए, सी, झिंक आणि लोह यांसारखे महत्त्वाचे घटक शरीराला मिळण्यास मदत होते.

येथे क्लिक करा