Monkeys Prevent | 'हे' उपाय करा, माकडे घराच्या आसपास फिरकणार नाहीत

पुढारी वृत्तसेवा

अनेक घरांमध्ये माकडे छतांवरून उड्या मारताना, गॅलरीतून फिरताना किंवा उघड्या खिडक्यांच्या आसपास काही मिळते का पाहताना दिसतात

उघड्या खिडक्यांजवळील स्वयंपाकघर, अंगणातील फळझाडे, उघड्या कचराकुंड्या येथे काही खाण्यासाठी मिळते का, हे पाहण्यासाठी माकडे येतात

विशेषता माकडे विनाकारण आक्रमक होत नाहीत, पण ते वारंवार येऊ लागल्यास माणसांसाठी आणि त्यांच्या स्वतःसाठीही धोके निर्माण होऊ शकतात

माकडांना दूर हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते चावा घेण्याचा प्रयत्न करतात, माकडे विद्युत तारा, छतावरील कौले किंवा बागेतील कुंड्यांचे नुकसान करतात

स्वयंपाकघरात अन्न असताना खिडक्या बंद ठेवणे, फळे खुले ठेवण्याऐवजी आत ठेवणे आणि गच्चीवर खाद्य पदार्थ टाकणे टाळावे

स्वयंपाकघर किंवा गच्चीच्या खिडक्यांना जाळ्या लावणे, छतावरील फटींना जाळी बसवणे किंवा टेरेसवरील कमकुवत भाग मजबूत करून घ्यावा, जेणेकरून माकडांना प्रतिबंध होईल

मोशन-सेन्सर असलेली लाईट्स किंवा स्प्रिंकलर्स अधूनमधून वापरल्यास माकडांना अनपेक्षित अडथळे निर्माण होतात

घराभोवती काही बदल केल्याने माकडांना तो परिसर असुरक्षित वाटू शकतो. माणसांची नियमित गच्चीवर बसणे, बागेत फिरणे हेही माकडांना दूर ठेवतो

संपूर्ण परिसर एकत्र येऊन कचऱ्याचे व्यवस्थापन, खाऊ न टाकणे आणि समान नियम पाळतो, तेव्हा माकडांचा वावर कमी होऊन संघर्षही कमी होण्यास मदत होते

येथे क्लिक करा