Rice Storage Tips | तांदळाला कीड लागतेय? वर्षभर तांदूळ साठवण्यासाठी फॉलो करा या भन्नाट आयडिया

पुढारी वृत्तसेवा

कोरड्या जागी साठवणूक: तांदूळ नेहमी कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवावा. आर्द्रतेमुळे तांदळाला कीड लागण्याची शक्यता अधिक असते.

सूर्यप्रकाशाचा वापर: साठवणुकीपूर्वी तांदूळ काही वेळ कडक उन्हात वाळवावेत. यामुळे त्यातील ओलावा पूर्णपणे निघून जातो आणि धान्याला कीड लागत नाही.

कडुनिंबाची पाने: तांदळाच्या डब्यात कडुनिंबाची वाळलेली पाने टाकल्यास नैसर्गिकरित्या कीड प्रतिबंध होतो.

Neem Leaves | file photo

लवंग किंवा तमालपत्राचा वापर: लवंग आणि तमालपत्राचा तीव्र वास नैसर्गिक कीटकनाशकाप्रमाणे कार्य करतो, ज्यामुळे कीड दूर राहते.

Use of cloves or bay leaves

हवाबंद डब्यांचा वापर: तांदूळ साठवण्यासाठी नेहमी 'एअरटाइट' म्हणजेच हवाबंद डब्यांचा वापर करावा, जेणेकरून बाहेरील हवा आणि ओलावा आत जाणार नाही

सुक्या लाल मिरच्या: तांदळाच्या साठवणुकीत काही सुक्या लाल मिरच्या टाकल्यास त्यातील तिखटपणामुळे कीड पळून जाते.

canva photo

प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा: प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ओलावा साचून राहतो, परिणामी तांदूळ खराब होण्याची दाट शक्यता असते.

Canva Image

साठवलेल्या तांदळाची वेळोवेळी तपासणी करावी. यामुळे कीड लागल्यास ती सुरुवातीच्या काळातच लक्षात येते.

Cooked Rice Fridge

रासायनिक औषधांचा वापर टाळून घरगुती आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे आरोग्यासाठी अधिक सुरक्षित ठरते.

Rice
Monsoon fruits | Pudhari Canva
<strong>येथे क्लिक करा...</strong>