पुढारी वृत्तसेवा
कोणत्याही नात्यात प्रेम, भांडणे किंवा चढ-उतार असणे अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र, जर आपल्या जोडीदाराला गमावण्याची भीती सतत असेल, तर त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर आणि नात्याच्या गोडव्यावर होतो.
अनेकदा ही भीती व्यक्तीला आतून पोखरत राहते. जर तुमच्या मनातही अशीच अनामिक भीती असेल, तर मानसोपचारतज्ज्ञांच्या मते काही सोप्या सवयींमधून तुम्ही या भीतीवर मात करू शकता.
भीतीचे मूळ कारण शोधा
नाते मजबूत करण्यासाठी सर्वप्रथम ही भीती भूतकाळातील एखाद्या वाईट अनुभवामुळे आहे का? की अतिविचार करण्याच्या सवयीमुळे? हे स्वतःला विचारा.
जोपर्यंत भीतीचे मूळ कारण समजत नाही, तोपर्यंत त्यावर उपाय शोधणे कठीण जाते.
अतिविचार थांबवा
नाते तुटण्याच्या भीतीमागे 'ओव्हरथिंकिंग' हे एक मुख्य कारण असते. ही सवय मोडून काढण्यासाठी दीर्घ श्वसन, ध्यानधारणा किंवा प्राणायामाचा सराव करा.
परस्पर विश्वास वाढवा
नात्यात विश्वास नसेल तर भीती सतत सतावत राहते. त्यामुळे जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा, आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा.
विनाकारण संशय घेणे टाळा. ज्या नात्याचा पाया विश्वासावर आधारलेला असतो, ते नाते सहजासहजी तुटत नाही.
अपुरी झोप, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळेही मानसिक ताण आणि चिंता वाढते. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घ्या.
संतुलित आहार ठेवा आणि रोज व्यायाम करा. शारीरिक स्वास्थ्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मोठी मदत होते.