पुढारी वृत्तसेवा
ब्रेकअप होऊन बराच वेळ झाला तरी अनेकदा 'एक्स'ची आठवण येत राहते. मन भूतकाळातच अडकून राहण्याची काही कारणे आहेत.
१. खोल भावनिक नाते: एकत्र घालवलेला वेळ आणि पाहिलेली स्वप्ने मनात कायम राहतात, ती सहज विसरता येत नाहीत.
२. सोशल मीडियाची सवय: जुने फोटो किंवा चॅट्स पुन्हा पुन्हा पाहिल्याने नात्याची जखम नेहमी ताजी राहते.
३. अधुरे प्रश्न : नाते अचानक का संपले, या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे मन तिथेच अडकून पडते.
४. एकटेपणाची भीती: "मला पुढे समजून घेणारा कोणी मिळेल का?" या भीतीपोटी माणूस जुन्याच आठवणींना धरून ठेवतो.
५. रोजच्या सवयीचा अभाव: रोज बोलण्याची आणि मेसेज करण्याची झालेली सवय अचानक बंद झाल्यावर मनाला रिकामेपणा जाणवतो.
६. कमी झालेला आत्मविश्वास: नात्यात फसवणूक झाली असल्यास माणूस स्वतःमध्येच दोष शोधू लागतो, ज्यामुळे आत्मविश्वासाला तडा जातो.
यावर काय उपाय करावेत?
मनाच्या जखमा भरून निघण्यासाठी स्वतःला पुरेसा वेळ द्या आणि स्वतःच्या आवडीनिवडी जपा.
'नो कॉन्टॅक्ट' रूल पाळा
माजी जोडीदाराला सोशल मीडियावर पाहणे किंवा त्यांच्याशी संपर्क ठेवणे पूर्णपणे थांबवा. यामुळे मनाला शांतता मिळेल.
स्वतःवर प्रेम करा
भूतकाळ बदलता येत नाही. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, नवीन संधींचा स्वीकार करा आणि आयुष्यात पुढे जा!