Tea and Acidity : पित्त न होणारा चहा कसा बनवायचा? जाणून घ्या

पुढारी वृत्तसेवा

भारतात बहुतेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळलेल्या चहाने होते. चहाची तलफ आणि त्यातून मिळणारी ऊर्जा यामुळे पित्त होत असूनही चहा सोडणे अनेकांना कठीण जाते.

तुम्हाला माहित आहे का? चहा प्यायल्यावर पित्त होण्यामागे एक विशिष्ट शास्त्रीय कारण आहे. हे कारण चहा बनवण्याच्या पद्धतीत दडलेले आहे.

चहामध्ये 'टॅनिन' नावाचा घटक असतो. जेव्हा आपण चहा पावडर आणि दूध एकत्र उकळतो, तेव्हा खरी प्रक्रिया सुरू होते.

दुधामध्ये प्रथिने असतात. चहा आणि दूध एकत्र उकळल्यामुळे टॅनिन आणि प्रथिने यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन काही अपचनीय घटक तयार होतात.

हे तयार झालेले अपचनीय घटक आपले शरीर सहजासहजी पचवू शकत नाही. यामुळेच पोटात जळजळ आणि पित्ताचा त्रास सुरू होतो.

जर तुम्हाला चहा सोडायचा नसेल, तर चहा बनवण्याची पद्धत बदला. ही साधी ट्रिक तुम्हाला पित्तापासून वाचवू शकते.

चहा बनवताना त्यामध्ये दूध घालून कधीही उकळू नका. पाणी, चहा पावडर, आले/वेलची हे मिश्रण स्वतंत्र उकळून घ्या.

दुसरीकडे दूध वेगळे गरम करून घ्या. लक्षात ठेवा, चहाचे पाणी आणि दूध एकत्र उकळणे टाळायचे आहे.

कपमध्ये चहा गाळून घ्या आणि त्यानंतर वरून गरम केलेले दूध त्यात मिसळा. ही पद्धत पोटासाठी सुरक्षित मानली जाते.

दूध वरून मिसळल्यामुळे टॅनिनची चुकीची प्रक्रिया टळते. आता पित्ताची भीती न बाळगता आपल्या आवडत्या चहाचा आनंद घ्या!