Kadhai Paneer Masala : कढई पनीरसाठी चटपटीत मसाला घरी कसा बनवायचा?

पुढारी वृत्तसेवा

पनीरला स्वतःची चव नसते, खरी जादू असते ती त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्याची. म्हणूनच बाजारासारखं कढई पनीर बनवण्यासाठी घरगुती मसाला बेस्ट ठरतो.

बाहेरच्या मसाल्यांपेक्षा घरी बनवलेला मसाला अधिक फ्रेश आणि सुगंधी असतो. यामुळे तुमच्या भाजीला अगदी रेस्टॉरंटसारखी चव आणि खमंगपणा येतो.

सर्व अख्खे मसाले मंद आचेवर हलके भाजून घ्या. मसाल्यांचा रंग बदलेपर्यंत आणि छान सुगंध सुटेपर्यंत ते परतायचे आहेत.

मसाले व्यवस्थित भाजले गेले आहेत की नाही हे ओळखण्याची सोपी ट्रिक म्हणजे त्यातील तमालपत्र. भाजल्यानंतर तमालपत्र हाताने मोडण्याइतपत कडक व्हायला हवे.

मसाले गरम असताना कधीही वाटू नका. भाजलेले मसाले पूर्णपणे थंड होऊ द्या, यामुळे मसाल्याचा नैसर्गिक सुगंध टिकून राहतो.

हा मसाला मिक्सरमध्ये एकदम बारीक न करता वाटून घ्यावा. तुम्ही हवं असल्यास खलबत्त्यात कुटूनही घेऊ शकता, त्याने चव अजून वाढते.

हा तयार मसाला तुम्ही एका 'एअरटाईट कंटेनर'मध्ये भरून दीर्घकाळ साठवू शकता. जेव्हा पनीरची भाजी बनवाल, तेव्हा फक्त एक-दोन चमचे मसाला वापरा.

हा खास मसाला वापरल्यावर तुमच्या कढई पनीरचा सुगंध घरभर दरवळेल. खाणारे लोक चवीने बोटं चाटत राहतील आणि तुम्हाला रेसिपी नक्की विचारतील.