पुढारी वृत्तसेवा
अत्तर हे १००% नैसर्गिक सुगंधी तेलांपासून बनतं. तर परफ्युममध्ये सुगंधी तेल, अल्कोहोल आणि पाण्याचं मिश्रण असतं.
परफ्युम मारताच त्यातील अल्कोहोल हवेत उडून (बाष्पीभवन) जातं. त्यासोबत सुगंधी रेणूही हवेत पसरतात. यामुळेच सुगंध हळूहळू कमी होत जातो.
परफ्युममध्ये ३ प्रकारच्या नोट्स असतात:
टॉप नोट्स: मारल्या मारल्या येणारा पहिला वास.
हार्ट नोट्स: परफ्युमचा मुख्य आत्मा.
बेस नोट्स: सर्वात शेवटी उरणारा जड सुगंध.
कोरड्या किंवा उष्ण त्वचेवर परफ्युम जलद उडून जातो. याउलट, तेलकट त्वचा सुगंधी रेणूंना जास्त काळ धरून ठेवते.
त्वचेच्या तुलनेत कपड्यांवर मारलेला परफ्युम जास्त वेळ दरवळतो. कारण कपड्यांवर बाष्पीभवनाचा वेग मंद असतो.
परफ्युम हवेच्या संपर्कात आला की 'ऑक्सिडेशन' होतं. हवेतील ऑक्सिजनमुळे सुगंधी रेणूंची रचना बदलते, ज्यामुळे सुगंध मंद होतो.
उन्हातील अतिनील किरणांमुळे सुगंधी रेणूंचे रासायनिक बंध तुटतात. म्हणूनच परफ्युम बहुतेकदा गडद काचेच्या बाटलीत असतात.
सुगंध टिकवण्यासाठी काय करावे?
परफ्युमची बाटली कधीही उन्हात किंवा दमट जागी ठेवू नका. ती नेहमी कोरड्या आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवा.